
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर सध्या पर्यटकांची गर्दी दिसू लागली
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर सध्या पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.अथांग असा समुद्र, मंदिरं, प्रसिद्ध अशी ठिकाणी, डोंगरदऱ्यांमधून वसलेली टूमदार गावं आणि सर्वत्र हिरवाई असं वातावरण सध्या जिल्ह्यात असल्याने त्या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढत आहे. दरम्यान, नाताळ, नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी, पर्यटकांसाठी विविध सुविधा देण्यासाठी स्थानिक व्यापारी आणि नागरिक देखील सज्ज झाले आहेत. राजापूर, दापोली, गुहागर, रत्नागिरी या तालुक्यांमध्ये अनेक प्रसिद्ध ठिकाणं असल्याने सध्या पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहे. कोरोनाकाळानंतर सर्व सुखसोयींनीयुक्त अशी जिल्ह्यातील ठिकाणं आहेत.जिल्ह्यात अद्याप तरी कोणतेही कडक असे निर्बंध नाहीत. पण, येणाऱ्या पर्यटकांनी, व्यापाऱ्यांनी आणि स्थानिकांना कोरोनाकाळातील नियमांचं पालन करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
www.konkantoday.com