
आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेला दिला मोठा धक्का
*आरबीआयने प्रायव्हेट सेक्टरमधली मोठी बँक समजल्या जाणाऱ्या कोटक महिंद्रा बँकला मोठा धक्का दिला आहे. आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने बुधवारी तात्काळ क्रेडिट कार्ड जारी करण्यापासून रोखण्याचे निर्देश दिले आहेत.याशिवाय आरबीआयने बँकेला ऑनलाईन आणि मोबाईल बॅकिंगच्या माध्यमातून नवे ग्राहक जोडण्यावरही निर्बंध घातले आहेत.कोटक महिंद्रा बँकेच्या आयटी सिस्टीममध्ये आरबीआयला त्रुटी आढळल्या होत्या, याबद्दल आरबीआयने बँकेकडे उत्तरही मागवलं होतं, पण हे उत्तर आरबीआयला समाधानकारक वाटलं नाही. आरबीआयने ही कारवाई 2022 आणि 2023 च्या आयटी तपासानंतर केली आहे.www.konkantoday.com