अन्यथा प्रकल्प समर्थकांचा उद्रेक होवून ते रस्त्यावर उतरतील- कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचा इशारा
सुमारे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या रिफायनरी प्रकल्पातून लाखो लोकांना रोजगार मिळणार अन् कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प स्थानिकांना हवा आहे. प्रकल्प समर्थन वाढू लागले आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये लोकप्रतिनिधींनी प्रकल्प समर्थकांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून द्यावी. अन्यथा प्रकल्प समर्थकांचा उद्रेक होवून ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर आणि सचिव अविनाश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
www.konkantoday.com