कोकण रेल्वे मार्गावर रविवारपासून धावणार पुणे-एर्नाकुलम फेस्टीव्हल स्पेशल
कोकण रेल्वे मार्गावर दि. २७ डिसेंबरपासून पुणे-एर्नाकुलम सुपरफास्ट फेस्टीव्हल स्पेशल ही संपूर्ण आरक्षित असलेली गाडी धावणार आहे.
पुणे-एर्नाकुलम ही गाडी दि. २७ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत धवणार आहे. पुण्याहून दर बुधवार, रविवारी सायंकाळी ६.४५ वा. सुटणारी गाडी दुसर्या दिवशी सायंकाळी ६.५० वा. एर्नाकुलमला पोहोचेल. एर्नाकुलम-पुणे ही गाडी दि. २९ डिसेंबर ते दि. २ फेब्रुवारी या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. एर्नाकुलमहून दर मंगळवार, शुक्रवारी पहाटे ५.१५ वा. सुटणारी फेस्टीव्हल ट्रेन दुसर्या दिवशी सकाळी ५.५० वा. पुण्याला पोहोचेल.
सदरची सुपरफास्ट फेस्टीव्हल स्पेशल ट्रेन पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मडगांव, कारवार, कुंडपुरा, उडपी, मंगळुरू, कासरागोड, कन्नूर, तेलीचेरी, कोझीकोड, तिरूर, शोरानूर, त्रिस्सूर या स्टेशनवर थांबणार आहे.
www.konkantoday.com