
लांजात मोटर सायकलने धडक दिलेल्या वृद्धाचा मृत्यू
मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने गंभीररित्या जखमी झालेले सदानंद कृष्णा कांबळे (७५, हसोळ बौद्धवाडी, ता.लांजा) यांचे जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
मोटारसायकल वेगाने चालवून पादचारी व्यक्तीला धडक देत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी मोटारसायकलस्वार रवींद्र शरद शिंदे (३७, रा.वेरळ मधलीवाडी, ता. लांजा) वर गुन्हा दाखल केला आहे, हा अपघात ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता झाला होता.
शहरात मुंबई-गोवा महामार्गावर कुलकर्णी-काळे छात्रालयासमोर हा अपघात झाला होता. मोटारसायकलस्वाराने राजापूरच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या कडेने जाणारे पादचारी कांबळे याना पाठीमागून ठोकर दिली होती.