
डोंगर गणेशवाडी येथे गोवा बनावटीची दारू विकणार्यावर गुन्हा
राजापूर : डोंगर गणेशवाडी येथे गोवा बनावटीची दारू विक्री करीत असताना राजापूर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई 6 रोजी सायंकाळी डोंगर गणेशवाडी येथे एका घराच्या बाजूला असलेल्या गोठ्याजवळ करण्यात आली. राजेंद्र सुरेश शिंदे (वय 39, रा. मु. पो. डोंगर गणेशवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राजापूरचे पोलिस शिपाई नितीन चंद्रकांत फाळके (वय 30) यांनी फिर्याद दिली. ही कारवाई महिला पोलिस हवालदार हर्षदा चव्हाण, पोलीस नाईक सचिन वीर यांनी केली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार हर्षदा चव्हाण या करीत आहेत.