
जेएसडब्ल्यू व चौगुले या कंपन्यांमुळे मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, जयगड मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या शिष्टमंडळाचे मत्स्योद्योग व बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांना निवेदन
चौगुले शिपिंग कंपनीच्या ड्रेझिंगमुळे जयगड परिसरातील खाडीलगतच्या घरांना धोका निर्माण झाल्याची तक्रार जयगड मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या शिष्टमंडळाने मत्स्योद्योग व बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांच्याकडे केली आहे.
चौगुले कंपनीच्या आंग्रे पोर्टचा विस्तार करण्यात येत आहे. बंदराची खोली वाढविण्यासाठी कंपनीकडून मोठ्या प्रमाणात ड्रेझिंग सुरू आहे. हे ड्रेझिंग केल्यामुळे जयगड परिसरातील किनार्यालगतच्या घरांखालील जमिनीची धूप होत आहे. पर्यायाने त्यांच्या घरांना धोका निर्माण झाला असून, या घरांचे नुकसान झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार?असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला.
जेएसडब्ल्यू व चौगुले या कंपन्यांमुळे मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या कंपन्यांची मनमानी सुरू आहे. त्यासाठी ना. अस्लम शेख यांनी स्वत: परिस्थितीची पाहणी करून ड्रेझिंगचे काम त्वरित बंद करण्यास संबंधितांना भाग पाडावे, अशी मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळासोबत माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे, रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष हारिस शेखासन, राजापूरचे नगराध्यक्ष जमीर खलिफे, जयगड परिसरातील नेते बशीर होडेकर, संस्थेचे अध्यक्ष तबरेज सोलकर आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com