
कृषि विभागामार्फत राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप या प्रकल्पात यावर्षीपासून काजूचाही समावेश
कृषि विभागामार्फत राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप या प्रकल्पात यावर्षीपासून काजूचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंब्याबरोबरच काजूवरही कोणत्या कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे याची माहिती मिळून तत्काळ उपाययोजना करता येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांचे होणारे नुकसान कमी होणार आहे.
कृषि विभागामार्फत सन २०१५-१६ पासून आंबा पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत किडी व रोगांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यासाठी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये स्वतंत्र कीड सर्वेक्षकाची नेमणूक केली असून कृषी पर्यवेक्षक सर्वेक्षण करतात.
www.konkantoday.com