राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर माडबन अणुउर्जा प्रकल्पातील ९५ टक्के प्रकल्पग्रस्तांनी स्विकारले अनुदान
शिवसेनेने ठाम विरोध केलेल्या राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर माडबन अणुउर्जा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त पाच गावातील सुमारे ५ टक्के लाभार्थ्यांनी शासनाकडून देय असलेले मुळ आणि सानुग्रह अनुदान स्विकारले आहे. आजपर्यंत एक हजार ८४५ खातेदारांना मूळ अनुदानापोटी १३ कोटी ६५ लाख तर सानुग्रह अनुदानापोटी १९५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त पाच गावातील सुमारे ९५ टक्के प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांनी मुळ आणि सानुग्रह अनुदान स्विकारून अणुउर्जा प्रकल्पाला एकप्रकारे संमती दर्शविली असल्याचे दिसून आले आहे.
www.konkantoday.com