
रत्नागिरी तालुक्यातील देवूड- चाटवडवाडी येथील जंगलमय परिसरात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा मिळाला
रत्नागिरी तालुक्यातील देवूड- चाटवडवाडी येथील जंगलमय परिसरात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
रविवारी या जंगलमय परिसारात स्थानिक तरुण फोटो काढण्यासाठी गेले असताना त्यांना एका झाडाला कपडयाने गळफास घेतलेल्या अवस्थेत काही मानवी हाडे दिसून आली.त्यांनी तातडीने याबाबत ग्रामीण पोलिसांना खबर दिली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना त्या ठिकाणी मणक्याची काही हाडे, मानवी कवटी, एक हाफ पॅन्ट, पैशांचे पाकिट त्यात ५० रुपयांची एक खराब अवस्थेतील नोट आणि एक पासपोर्ट साईज फोटा मिळून आला.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलायाबाबत तपास सुरू आहे
www.konkantoday.com