शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करून नोव्हेंबर महिन्यात नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुरूवातीला शाळांमध्ये येणार्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत आहेत. सध्या जिल्ह्यातील ३४९ शाळा सुरू असून २५ हजार १७१ विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत आहेत.
www.konkantoday.com