रत्नागिरीच्या शिरपेचात ‘आयएनएस खुकरी’ बनवण्याचा मान ,सचिन चव्हाण’ची नेत्रदीपक कामगिरी

0
385

भंडारी युवा प्रतिष्ठान रत्नागिरी कडून देण्यात आल्या शुभेच्छा.

रत्नागिरी शहराजवळील जुवे गावच्या सचिन चव्हाण या तरुणाने ‘आयएनएस खुकरी’ या युद्धनौकेची ३२ फुटी मॉडेल साकारले आहे. तब्बल सहा महिने प्रचंड मेहनत घेऊन हे मॉडेल बनवले असून दीव- दमण येथे २२ डिसेंबरला केंद्रीय संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. आज दीवला जाण्याकरिता सचिन चव्हाण व सहकारी निघणार असून भंडारी युवा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
सचिन चव्हाण हे मुंबई नेव्हलमध्ये शिप मॉडेलिंग इन्स्ट्रक्टर आहेत. त्यांना हे मॉडेल बनवण्याची संधी पोर्ट व नेव्हलद्वारे देण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात जुवे गावी येऊन त्यांनी कामाला सुरवात केली. १९७१ च्या युद्धामध्ये ‘आयएनएस खुकरी’ला पाकिस्तानच्या पाणबुडीने हल्ला करून बुडवले. त्यात कॅप्टन महेंद्रनाथ मुल्लांसह १९४ खलाशी शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ दीव- दमण येथे स्मारक उभारले. तेथे यापूर्वी एक मॉडेल बनवले होते. पण आता नूतनीकरण्यात आले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here