मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे परशुराम ते तळेकांटे काम रखडले,आमदार शेखर निकम यांच्या तक्रारीची गंभीर दाखल

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील काम वेगाने सुरू असताना चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील परशुराम ते तळेकांटे या मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या कामाला गती मिळावी , यासाठी आमदार शेखर निकम प्रयत्नशील आहेत. आमदार शेखर निकम यांनी १४ ऑक्टोबर २०२० रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना याबाबत सविस्तर पत्र लिहिले होते व लेखी तक्रार केली होती. या पार्श्‍वभूमीवर अजितदादांनी अत्यंत गांभीर्याने या विषयात लक्ष घातले या परशुराम ते तळेकांटे या मार्गाचे काम का रखडले आहे, यात अत्यंत तातडीने व गांभीर्याने लक्ष घालावे व हे काम तातडीने मार्गी लावावे, असे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाचे समन्वयक बी. डी. थेंग यांनी काढले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button