राज्य सरकारने पुरवणी मागणीद्वारे शेतकऱ्यांना दोन हजार २११ कोटींचा दुसरा हप्ता मंजूर केला
परतीच्या पावसाने जोरदार झटका देत राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील सुमारे ६२ लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, कृषी मंत्री यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनीही नुकसानीची पाहणी केली. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात दोन हजार २९७ कोटींची शेतकऱ्यांना मदत दिली. त्यानंतर दुसऱ्या हप्त्याची बळीराजाला प्रतीक्षा होती. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता आता राज्य सरकारने पुरवणी मागणीद्वारे शेतकऱ्यांना दोन हजार २११ कोटींचा दुसरा हप्ता मंजूर केला आहे.
www.konkantoday.com