
शिवसेनेचे माजी आमदार सुभाष बने यांनी रोहन बने यांच्या उमेदवारीसाठी मातोश्रीवर फिल्डिंग लावली
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण – संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात आता उमेदवारी मिळवण्यासाठी वेगगेवळ्या रणनीती आखल्या जात आहेत. शिवसेनेचे माजी आमदार राहिलेले सुभाष बने आपल्या मुलाला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी थेट ‘मातोश्री’वर फिल्डींग लावली आहे. सुभाष बने यांचा मुलगा रोहन बने जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहेत. शिवाय, चिपळूण – संगमेश्वर या विधानसभा क्षेत्रात त्यांचा वावर, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्कदेखील चांगला आहे. त्याच जोरावर आणि माजी आमदार म्हणून असलेल्या जनसंपर्काच्या जोरावर सुभाष बने सध्या सक्रीय झालेले आहे. रोहन बने यांना तिकीट मिळावे यासाठी त्यांच्याकडून सध्या जोरदार प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, सध्या अजित पवार यांच्यासोबत असलेले शेखर निकम हे या ठिकाणीदरम्यान, सध्या अजित पवार यांच्यासोबत असलेले शेखर निकम हे या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत. चिपळूण – संगमेश्वर ही विधानसभेची जागा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. अजित पवार गटासोबत गेलेले शेखर निकम या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी असो किंवा महायुती यांच्यामध्ये सद्यस्थिती पाहता जागा इतर पक्षाला किंवा उमेदवाराला देणार का? असा प्रश्न आहे. मुख्य बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांचा पराभव झाला.