
खासदार, शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी लांजा शहराच्या विकासासाठी ५ कोटी निधीची मागणी केली
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी लांजा नगरपंचायत क्षेत्रामध्ये वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नागरिकांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येची तात्काळ दखल घेऊन लांजा शहराला मोठ्या आकाराच्या जलवाहिन्या टाकण्याकरीता रु.५ कोटी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केली. या वेळी लांजा नगरपंचायत नगराध्यक्ष मनोहर बाईत उपस्थित होते.
www.konkantoday.com