रत्नागिरीत गरोदर माता व बालकांना निकृष्ट धान्य वाटप , भाजप युवा मोर्चाने केला प्रकार उघड
जिल्ह्यातील २०८ अंगणवाड्यातील ३ ते ६ वयोगातील मुले, गरोदर आणि स्तनदा माता याना अत्यंत निकृष्ठ दर्जाचे, टोके, किडी लागलेले धान्य चांगल्या पॅकिंगमधून अन्न व औषध प्रशासनाचे अनेक नियम डावलून रत्नागिरीतुन वितरित केले जात असल्याचा प्रकार भारतीय युवा मोर्च्याच्या युवा पदाधिकाऱ्यांनी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी उघड केला. यामुळे रत्नागिरीत एकच खळबळ उडाली. शेवटपर्यंत हा प्रकार भाजयुमोच्या धसास लावल्यामुळे अखेरीस रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झालेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गोडावून ताब्यात घेऊन आपल्या कारवाईस सुरुवात केली
www.konkantoday.com