महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थीनीला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था शिरगांव, येथे ध्वजारोहणाचा मान :-


गेल्या तीन वर्षांपासून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगांव येथील प्रकल्पात, एक स्तुत्य परंपरा जपली जात आहे . महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या (BCA) तृतीय वर्षात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहणाचा मान दिला जातो. या उपक्रमामुळे महाविद्यालयात शैक्षणिक गुणवत्तेसोबतच देशभक्ती, जबाबदारी आणि आत्मगौरव यांचीही रुजवणूक होत आहे.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था शिरगांव येथे 79 व्या स्वातंत्र्यदिनी सुरुवातीला भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कु. मंजिरी कांबळे या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कु. मंजिरी कांबळे हिने S.N.D.T. विद्यापीठामार्फत आयोजित अविष्कार रिर्सच कॉम्पीटीशन मध्ये भाग घेऊन आत्मविश्‍वासाने प्रथम क्रमांक मिळाला. यावेळी तिने महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपला सर्वांगीण विकास करावा असे आव्हान केले. यासाठी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय कायम प्रोत्साहन देते व यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला व ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली व त्यासाठी ती शिक्षकांची, सदस्यांची,पालकांची ऋणी राहील असे नमूद केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी नवलाई ग्रुप,रत्नागिरी चे डायरेक्टर मा. श्री जितेंद्र सावंत तसेच त्यांच्या पत्नी सौ. पूर्वा सावंत ,संस्थेचे प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई, प्रकल्प समन्वयक स्वप्निल सावंत, सदस्य प्रसन्न दामले, सदस्या सौ. स्वरुपा सरदेसाई, सौ. शिल्पा पानवलकर, प्र.प्राचार्या स्नेहा कोतवडेकर ,नर्सिंग कॉलेज प्र .प्राचार्या समीना मुलाणी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
NSS विभाग व अँटी रॅगिंग कमिटी मार्फत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आले.
यावेळी श्री. जितेंद्र सावंत यांनी “शिक्षण ही विकासाची पहिली पायरी आहे व त्यासाठी कष्ट, मेहनत जरुरी असे सांगितले. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण काम करतो तिथे तुमचे उच्च व स्पष्ट विचार आणि पवित्रता आत्मसात केल्याने यशस्वी होण्यास मदत होते. तसेच आपल्या मेहनतीने केलेल्या कर्माने देखील आपण देशसेवेमध्ये योगदान देऊ शकतो असे नमूद केले.”
प्रकल्प प्रमुख श्री.मंदार सावंत देसाई यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच अशा प्रेरणादायी उपक्रमांची गरज आहे. हा उपक्रम म्हणजे गुणवत्तेचा सन्मान आणि प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. यावेळी त्यांनी थोर स्वातंत्रसैनिकांची उदाहरणे दिलीत, की ज्यांच्या प्रयत्नांमुळे आपला भारत देश स्वातंत्र होण्यास मदत झाली.तसेच झाशीच्या राणीच्या स्वांतत्र मधील त्यागपूर्ण योगदानाचे कायम सर्वांनी स्मरण ठेवावे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन वेदिका आगाशे व आभार प्रदर्शन सौ रश्मी यादव यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदेमातरम ने करण्यात आली. कॉलेजमधील सर्व विद्यार्थिनी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button