
शेतकरी आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याने उत्तर भारतातून देशभरात होणारा औषधांचा पुरवठा खंडित
शेतकरी आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याने उत्तर भारतातून देशभरात होणारा औषधांचा पुरवठा खंडित झाला असून भविष्यात अशीच स्थिती राहिल्यास औषधांचा तुडवडा भासण्याचा धोका असल्याची चिंता व्यक्त करत यावर तोडगा काढण्याची मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अण्ड ड्रगिस्टने (एआयओसीडी) पत्राद्वारे पंतप्रधानांना केली आहे.
देशातील बहुतांश कंपन्यांचे उत्पादन हे हरियाणा, हिमाचल प्रदेश इत्यादी उत्तरेकडील राज्यांमध्ये होत असून येथून पुरवठा देशभरात केला जातो. परंतु शेतकरी आंदोलन सुरू झाल्यापासून वाहतूक ठप्प झाल्याने येथून होणारा पुरवठाही गेल्या काही दिवसांपासून बंद झाला आहे.
www.konkantoday.com