राजापूरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी १६ कोटी ७२ लाखांचा आराखडा तयार
पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने कोकण ग्रामीण पर्यटनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये राजापूर तालुक्यातील अठरा गावातील पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात येणारया ठिकाणी पायाभूत व मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणे, रस्ते करणे व त्या ठिकाणी पर्यटनदृष्ट्या साज देण्याच्या कामांचा समावेश आहे. आराखड्याला सुमारे १६ कोटी ७२ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. आ. राजन साळवी यांनी तालुक्यातील १८ गावांचा समावेश असलेला १६ कोटी ७२ लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
konkantoday.com