शालेय सहलींसाठी नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देणार


दिवाळीनंतर शालेय सहलींचे नियोजन शाळा करतात. त्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद देण्यासाठी एसटी महामंडळ राज्यातील २५१ आगारांमधून आठशे ते एक हजार बसेस उपलब्ध करून देणार आहे.गेल्यावर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान राज्यभरातील विविध शाळा महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळाने तब्बल १९,६२४ बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. या माध्यमातून एसटीला तब्बल ९२ कोटी रुपयांचा (प्रतिपूर्ती रकमेसह) महसूल प्राप्त झाला होता.

प्रताप सरनाईक, परिवहन मंत्रीशालेय सहलींसाठी एसटीच्या नवीन बसेसच उपलब्ध करू द्या, अशी सूचना केली आहे. एकूण भाड्यामध्ये ५० टक्के सवलतदेखील दिली जाणार आहे. आगारप्रमुख, स्थानकप्रमुख शाळा-महाविद्यालयांत जाऊन याबाबत जनजागृती करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button