युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर

0
39

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला. लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच हिंदुस्थानी शिक्षक ठरले आहेत. ७ कोटी रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
जगभरातील १४०देशांतील १२हजार हुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here