कोकण किनारपट्टीवर नियुक्त केलेले ६० सुरक्षारक्षक ऑगस्ट महिन्यापासूनपगाराच्या प्रतीक्षेत
कोकण किनारपट्टीवर नियुक्त केलेले ६० सुरक्षारक्षक ऑगस्ट महिन्यापासून हक्काच्या प्रतिक्षेत आहेत. हक्काचा पगार न मिळाल्याने सुरक्षारक्षक, त्यांचे कुटुंबिय आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. जिल्ह्यात ६० सुरक्षारक्षक नेमण्यात आले असून त्यात दोन सुरक्षा पर्यवेक्षकांचा समावेश आहे. सागरी किनारपट्टीच्या सुरक्षिततेसह अनधिकृत मासेमारी नौकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
www.konkantoday.com