
वेळ पडल्यास मी सतरंज्या उचलण्यासही तयार आहे -उर्मिला मातोंडकर
वेळ पडल्यास मी सतरंज्या उचलण्यासही तयार आहे असं वक्तव्य उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे. मी शिवसैनिक म्हणून काम करायचं आहे. मी शिवसेनेत लोकांची कामं करण्यासाठी आली आहेत. आज माझी ओळख शिवसैनिक अशीच आहे. शिवसेनेत आल्यानंतर मला शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला आवडेल. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या अशी चर्चा कायम होत असते. त्याबाबत उर्मिला मातोंडकर यांना विचारलं असता मी प्रसंगी सतरंज्या उचलण्यासही तयार आहे असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच पुढे जायचं आहे. आज मी माझी ओळख ही शिवसैनिक अशी करुन देते आहे तशीच ती आहे. मी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच काम करणार आहे असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com