नाणार रिफायनरी समर्थनार्थ मोहिमेला चांगला प्रतिसाद ,माजी नगराध्यक्ष ही सरसावले

नाणार येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा या मागणीसाठी २०जुलै रोजी समर्थकांचा भव्य मोर्चा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. हा मोर्चा यशस्वी झाल्याने समर्थकांचे मनोबल वाढले होते .त्यानंतर प्रत्यक्ष ज्या ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत त्या नाणार परिसरात राजापूर परिसरात या प्रकल्पाचे सकारात्मक बाजू मांडण्याच्या दृष्टीने बैठका घेण्यात येत आहेत. गावागावात प्रत्यक्ष भेटून गावकऱ्यांना या प्रकल्पाची बाजू व्यवस्थित सांगितल्याने गावकऱ्यांचे मतही या प्रकल्पाच्या बाजूने होत आहे. आता राजापूरच्या सात माजी नगराध्यक्षांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे.त्यामध्ये माजी नगराध्यक्ष आनंद पाटणकर ,सुरेश कोळेकर ,रमांकांत मालपेकर ,जावेद ठाकूर ,जयप्रकाश नार्वेकर ,मधुकर देवरुखकर आदींनी पुढे येत हा प्रकल्प राजापूर नाणार येथून घालवू नये अशी मागणी केली आहे. हा प्रदूषण मुक्त प्रकल्प येथे आल्यास स्थानिकांना रोजगार व नोकरी मिळणार आहे .शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य सुविधा व पर्यटन वाढीला सहाय्यभूत ठरणाऱ्या अशा रिफायनरी सारख्या उद्योगाची तालुक्याला गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button