
चिपळूण येथील असुर्डे धरणात महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आढळले
चिपळूण तालुक्यातील असुर्डे धरणात आज सकाळी महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आढळले आहेत हे सर्वजण एकाच घरातील असून काल धरणपरिसरात लाकडे आणण्यासाठी गेले होते ते काल घरी परतले नाहीत म्हणून आज सकाळी ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केल्यावर त्यांचे मृतदेह धरणाच्या पाण्यात दिसून आले मयुरी चौगुले वय ३५ ,हर्ष चौगुले(११) व शारदा चौगुले( १३) अशी नावे असून त्यांचे मृतदेह धरणात सापडल्याने गावात खळबळ उडाली आहे घटनास्थळी चपला व अन्य सामान ठेवलेले आढळले त्यामुळे हा प्रकार अपघात आहे की आत्महत्या आहेहे अद्याप कळलेले नाही घटनास्थळी पोलिस रवाना झाले आहेत
www.konkantoday.com
