रत्नागिरी नगर परिषदेच्या आजपासून अतिक्रमणविरोधी मोहीम ,अनेकांनी आधीच अतिक्रमणे हटविली
रत्नागिरी शहरात वाढलेल्या टपऱ्या, अनधिकृतबांधकामे आणि फुटपाथ वरील गर्दी हटवण्यासाठी आज
पासून खास मोहीम हाती घेण्यात येणार आहे. नुकतेच झालेल्या
सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेण्यात आला असूनलवकरच रस्ते आणि फुटपाथ मोकळा श्वास घेण्याची शक्यताआहे.रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप
येथूनच अनधिकृत बांधकामाचे साम्राज्य उभे राहिले आहे.शहरातील प्रत्येक वार्डात अनधिकृत टपऱ्या आणि खोक्यांचीसंख्या वाढली आहे.
अनधिकृत टपऱ्यांमुळे शहराची अवस्था बकाल झाली आहे अनधिकृतखोके, टपऱ्या आणि अतिक्रमण करणाऱ्यावर नगरपरिषद
कारवाई करणार असून हि कारवाई साळवी स्टॉपपासून सुरू
होणार आहे दरम्यान नगर परिषदेने अतिक्रमणे हटविण्याबाबत दोन दिवस लाऊडस्पीकर लावून रिक्षा फिरवल्याने अनेकांनी स्वत हून अतिक्रमणे तात्पुरत्या काढली आहेत
www.konkantoday.com