मुंबईकरांचा प्रवास टोल फ्री, सिग्नलमुक्त वेगवान करणारा कोस्टल रोडची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली
मुंबईकरांचा प्रवास टोल फ्री, सिग्नलमुक्त वेगवान करणारा आणि वेळ-इंधनाची बचत करणाऱया पालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रासह जगभरात कोरोनाविरोधात जोरदार लढाई सुरू असतानाही कोस्टल रोडचे काम हिमतीने सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी पालिका आणि अविरत मेहनत करणाऱया कामगार-अधिकाऱयांचे कौतुक केले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com