सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात९० लाख रुपये घोटाळाप्रकरणे पाच कर्मचारी निलंबित
गाड्यांचे कर न भरता गाड्या रजिस्ट्रेशन केल्याचा प्रकार सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उघड झाला होता. २०१७ ते २०२० या कालावधीत हा सुमारे ९० लाख रुपये एवढा घोटाळा झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीत या कार्यालयात कार्यरत असलेल्या ५ कर्मचार्यांना दोषी ठरवत या पाचही जणांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाची कारवाई परिवहन आयुक्त, कोकण विभाग यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सन २०१७ ते २०२० या कालावधीत १०४ बीएस ४ वाहनांची नोंद झाली होती. मात्र, या सर्व वाहनांचा कर भरण्याची फसवणूक करण्यात आली होती.
www.konkantoday.com