दारुमुळे किती कोरोना रुग्ण बरे झाले अगोदर ती यादी जाहीर करा. शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक आहेत,”माजी खासदार निलेश राणे यांची शिवसेनेवर टीका
राज्यात करोनाची भीती पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असून, मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रार्थनास्थळं सुरू केल्यामुळेच रुग्णांची संख्या वाढत असल्याचा दावा केला होता. “दिवाळीत राज्यातील प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच करोना रुग्णांची संख्या वाढली,” असं महापौर पेडणेकर यांनी म्हटलं होतं. दरम्यान, यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला.
“सर्वात अगोदर दारूची दुकाने उघडली, दारुमुळे किती कोरोना रुग्ण बरे झाले अगोदर ती यादी जाहीर करा. शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक आहेत,” असं म्हणत निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली.
www.konkantoday.com