प्रसाद लाड यांनी जनतेतून एकदा तरी निवडून यावे -एकनाथ खडसे यांचे आव्हान

0
26

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ए्कनाथराव खडसे व भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांच्यात शाब्दीक वाद सुरू झाला आहे. खडसेंनी लाड यांच्यावर शाब्दीक टिका करत मी सहा वेळा जनतेतून निवडून आलो आहे. प्रसाद लाड यांनी जनतेतून एकदा तरी निवडून यावे असे खुले आव्हान खडसेंनी दिले आहे.
एकनाथ खडसेंनी भाजपला राम राम केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजप नेते व एकनाथ खडसें यांच्यात शाब्दीक युध्द रंगत आहे. आता माजी मंत्री प्रसाद लाड एकनाथराव खडसे यांच्यात वाद सुरू असून लाड यांनी खडसेंवर व्टीटरवर द्वारे आजपर्यंत राजकारणात भाजप संघटन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्य जीवावर निवडून येणारे स्वत:च्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत असे म्हटले होते
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here