वाढत्या विज बिलाच्या पार्श्वभूमीवर कडवई येथे वीज मीटर हटाव मोहिमेला प्रतिसाद

0
33

लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरण कंपनीमार्फत वाढीव वीज बिलाची आकारणी करून ग्राहकांची लुटमार सुरू ठेवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी या विरोधात व्यापक आंदोलन सुरू केले होते. महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी फक् आश्‍वासन देवून आपल्यावरील जबाबदारी जाणीवपूर्वक झटकली आहे.
ग्राहकांनी वीज बिलांची रक्कम न भरल्यास विद्युत कनेक्शन तोडण्याची धमकी महावितरणकडून सातत्याने दिली जात आहे. महावितरणच्या अनपेक्षित भूमिकेमुळे ग्राहक संतापले असून त्यांनी आपल्या कंपनीची वीजच नको अशी आक्रमक भूमिका स्विकारली आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here