आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे महामार्गावरील खड्डे भरण्याची निविदा निघाली
चिपळूण परिसरात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. काही ठिकाणी काँक्रीटचा रस्ता झाला आहे, मात्र अनेक ठिकाणी असलेल्या मूळ डांबरी रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. परशुराम ते आरवली या दरम्यान असलेले हे खड्डे भरावेत, अशी वारंवार मागणी होत आहे. याबाबत आमदार शेखर निकम यांनी महामार्ग विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर महामार्ग विभागाने चिपळूण, संगमेश्वरमधील परशुराम ते आरवली या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे कार्पेट करून भरण्याची निविदा काढली आहे. मनीषा कन्स्ट्रक्शनने हे काम घेतले असून दिवाळीनंतर खड्डे भरण्याचे काम हाती घेतले जाईल.
www.konkantoday.com