
नेवरे येथील नवीन पुलाच्या शेजारी केलेला कच्चा रस्ता वाहून गेला
रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासुन पावसाचा जोर वाढला आहे. गुरूवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. बुधवारी मध्यरात्री पडलेल्या पावसात तालुक्यातील नेवरे येथील नवीन पुलाच्या शेजारी केलेला कच्चा रस्ता वाहून गेला. यामुळे येथील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.www.konkantoday.com