जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक गावातील घरांत नळजोडणी दिली जाणार
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३१७ शाळांपैकी २८८ शाळांना नळजोडण्या आहेत. अजूनही २९ शाळांमध्ये नळजोडणी नाही. त्या शाळांना जलजीवन मिशनमधून जोडण्या देणार आहेत. त्याचबरोबर जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक गावातील घरांत नळजोडणी दिली जाणार असून, तसे न केल्यास ग्रामपंचायतीला अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
‘जलजीवन’ मिशन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत गावोगावी २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला
वैयक्तिक नळजोडणी देणार आहे.
www.konkantoday.com