जेली फिशमुळे पर्ससीन नेट मासेमारीवर विपरीत परिणाम
रत्नागिरीच्या समुद्रात पाण्याच्या पृष्ठभागाजवळ आलेल्या जेली फिशमुळे पर्ससीन नेट मासेमारीवर विपरीत परिणाम झाला आहे. ऊन पडल्यानंतर दुपारी हे जेली फिश समुद्र तळाशी जात असल्यामुळे पर्ससीन नेट मासेमारी नौकांना मासेमारीसाठी दुपारनंतर समुद्रात जावे लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मासेमारांसाठी डोकेदुखी असलेले जेली फिश रत्नागिरीच्या समुद्रात पाण्यात फिरताना दिसत आहेत.
www.konkantoday.com