
भरकटलेल्या जहाजांवरील सर्व कर्मचार्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह
निसर्ग वादळामुळे भरकटत समुद्रकिनारी आलेल्या इंधनवाहू जहाजावरील १३ कर्मचार्यांना रत्नागिरी कुवारबांव येथे कॉरंटाईन करून ठेवण्यात आले होते. या सर्वांचे कोरोनाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे आता त्यांची कॉरंटाईनमधून सुटका झाली आहे. गेले काही दिवस हे जहाज मिर्या समुद्रकिनारी खडकात अडकले आहे. त्यामुळे हे जहाज बाहेर काढण्याचे काम रेंगाळले होते. आता संबंधित एजन्सीची संपर्क साधून हे जहाज बाहेर काढण्यास सुरूवात होणार आहे.
www.konkantoday.com