कालव्यांचा पत्ताच नसल्याने राजापूर तालुक्यातील जनतेला भातशेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी वणवण
राजापूर तालुक्यात धरणे बांधून पूर्ण आहेत, आतमध्ये तुडुंब पाणीसाठा आहे. मात्र कालव्यांचा पत्ताच नसल्याने तालुक्यातील भातशेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी एक टिपूसभरही पाणी जनतेला मिळत नाही तर दुसरीकडे निधीची तरतूद नसल्याने काही धरणे अपूर्णावस्थेत आहेत. परिणामी तालुक्यातील जनतेला दरवर्षी उग्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र राजापूर तालुक्याचे आहे. मागील काही वर्षे तालुक्याची अशीच स्थिती आहे. मात्र, शासनाकडून त्याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने धरणात पाणी असूनही राजापूरच्या जनतेवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
www.konkantoday.com