महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सर्व सदस्य आज सोमवारी घरासमोर कुटुंबियांसह आक्रोश आंदोलन करणार

रत्नागिरी – एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांसमोर आहे. किमान दहा ते बारा वेळा भेटीगाठी घेऊनही महामंडळ व राज्य शासनाने काहीही केले नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सर्व सदस्य आज सोमवारी घरासमोर कुटुंबियांसह आक्रोश आंदोलन करणार आहेत. पगार न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संदीप शिंदे व सचिव हनुमंत ताटे यांनी दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button