
जिल्हा बँक अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांना साहित्य परिषदेचा पुरस्कार प्रदान
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी लिहिलेल्या बँक व्यवस्थापन पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने बँक ऑफ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने बँक ऑफ महाराष्ट्र लोकमंगल श्रेष्ठता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११३ वा वर्धापन दिन पुणे येथे साजरा करण्यात आला. प्रसिद्ध गुजराती साहित्यकार सितांशू यशश्चंद्र यांच्या हस्ते डॉ. तानाजीराव चोरगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रातील साहित्यिक कार्याकरिता पुरस्कार प्रदान केले जातात.