
पालशेत जवळ समुद्रात मच्छिमारी नौका बुडाली, खलाशी सुखरूप
समुद्रातील खराब हवामानामुळे गेली दोन महिने जयगड येथे अडकलेली श्री सोमनाथ ही मच्छीमारी नौका मुंबईच्या दिशेने जात असताना पालशेत समुद्रात बुडाल्याची घटना बुधवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेतील सर्व खलाशी सुखरूप आहेत. या बोटीवरील ६ खलाशी व १ तांडेल यांनी बोट वाचवण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला. मात्र बोट वाचणार नाही हे लक्षात येताच नाईलाजाने समुद्रात उड्या टाकत त्यांनी आपला जीव वाचवला. दुर्घटनेत बोटीचे पूर्णत: नुकसान झाले
www.konkantoday.com