उन्हाळी सुट्टीचा फायदा घेत खासगी बस चालकांनी केली तीस टक्के भाडेवाढ

रत्नागिरी – मे महिन्यात कोकणात पर्यटकांबरोबरच चाकरमानी धाव घेत असतात यामुळे कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचे बुकिंग चार महिने आधीच फुल झालेले असते यामुळे कोकणात येण्यासाठी खासगी बस वाहतुकीवर अवलंबून रहावे लागते कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा ओढा पाहून खासगी बसचालकानी आपल्या गाडीच्या भाडय़ात जवळजवळ तीस टक्के भाडेवाढ केली आहे. पूर्वी सहाशे रुपये असलेले भाडे आता नऊशे रुपये झाले आहे. मे महिना हा पर्यटकांचा देखील फिरण्याचा हंगाम असल्याने पर्यटकही मोठय़ा प्रमाणात कोकणात येत असतात या तिकीट वाढीवर शासनाचे कोणतेही बंधन नसल्याचा फायदा व्यावसायिक घेत आहेत.शासनाच्या एसटी विभागानेही नव्या धोरणानुसार सुट्टीच्या हंगामात काही प्रमाणात दरवाढ करण्याचे धोरण स्वीकारले आहे याची झळ मात्र सामान्य प्रवाशांना सोसावी लागत आहे.

Related Articles

Back to top button