खासदार नारायण राणे यांनी २०२४ ला स्वत: विधानसभा निवडणूक लढवावी-आमदार वैभव नाईक
खासदार नारायण राणे यांनी २०२४ ला स्वत: विधानसभा निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे.
नारायण राणेंनी शिवसेना संपवण्याची जेव्हा जेव्हा भाषा केली. त्यानंतर शिवसेना आजवर पहिल्यापेक्षा दुप्पट्टीने वाढली आहे. राणेंनी शिवसेनेचे कोकणातून ११ आमदार निवडून येणार नसल्याचे आव्हान दिले ते स्विकारून शिवसेनेने २०१४ सालीच आव्हान मुळातून मोडून काढले, त्यानंतर २०१४ मधे त्यांचा ह्य़ा निवडणुकीत पराभव झालाच. तर त्यांच्या मुलाचा देखील पराभव २ वेळा शिवनेनेने केला, असे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
तसेच राणेंना माहित असेल गेल्या निवडणुकीत त्यांचा मुलगा पक्ष बदलून भाजपामधून उभा राहिला अन्यथा तोही पराभूत झाला असता.
www.konkantoday.com