
चिपळूण शहरातील मुरादपूर येथे दोन लाखांची घरफोडी
चिपळूण शहरातील मुरादपूर येथे दोन लाखांची घरफोडी झाली आहे. या प्रकरणी रंजनी चंद्रकांत कदम ,. अमेय पार्क, मुरादपूर यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. कदम या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असता अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाच्या लॅचला चावी लावून दरवाजा उघडला व आत प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर तोडला. त्यातील दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रकमेसह दागिन्यांची पावती चोरून नेली
www.konkantoday.com