
कोणाचा बा जरी आला तरी तुमचे खांदे कधीच वाकणार नाहीत एवढे मजबूत करा- आमदार भास्करराव जाधव
कधीच वाकणार नाहीत एवढे खांदे मजबूत करा, आ. भास्करराव जाधव यांचा युवा सैनिकांना सल्ला युवासेना ही शिवसेनेचे पुढचे भविष्य आहे. तुमच्या खांद्यावर पुढची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे कोणाचा बा जरी आला तरी तुमचे खांदे कधीच वाकणार नाहीत एवढे मजबूत करा, असा सल्ला आमदार भास्करराव जाधव यांनी युवा सैनिकाना दिला. त्यांच्या जोशपूर्ण भाषणाने उपस्थित युवा सैनिकांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. कोरोना संपुदेत, शिवसेनेचे धगधगते अग्निकुंड संपूर्ण जिल्ह्यात दिसेल, असा विश्वासही श्री. जाधव यांनी यावेळी दिला.
चिपळूण युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते, शहरप्रमुख निहार कोवळे यांनी रविवारी चिपळूण युवासेनेचा मेळावा बांदल हायस्कूल सभागृहात आयोजित केला होता. यावेळी आ. जाधव यांनी मार्गदर्शन केले.
www.konkantoday.com