मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निधी देताना कुठलीच काटकसर करीत नाहीत-राज्यमंत्री अब्दुल सत्तार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निधी देताना कुठलीच काटकसर करीत नाहीत. महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांसहित, त्यांच्या खात्यांसहित त्यांच्या मतदार संघापर्यंत निधी दिला जातो. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्री हे समान न्याय देत असल्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी दौर्यावर आलेल्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे विधान खोडून काढले आहे. ते रत्नागिरीत बोलत होतेे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री यांच्याकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
www.konkantoday.com