खबरदारी घेतल्यामुळे मुंबईतील करोना नियंत्रणात – पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल
गेल्या महिन्याच्या तुलनेत करोना चाचण्यांचे प्रमाण दुप्पट केल्यानंतरही खबरदारी घेतल्यामुळे मुंबईतील करोना नियंत्रणात आला आहे. पालिकेच्या २४ विभागांपैकी २३ विभागांत करोना दुपटीचा कालावधी १०० दिवसांवर गेला असून आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जनतेने विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केले आहे.
मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप मोठे असून बहुतेक रुग्णालयांत करोनाचे बेड मोठय़ा प्रमाणात रिकामे आहेत. महापालिकेने मुखपट्टय़ा न वापरणाऱ्यांवर केलेली कठोर कारवाई तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजनेच्या अंमलबजावणीमुळे मुंबईतील करोना आटोक्यात येण्यास मोठी मदत झाल्याचे चहल यांनी सांगितले.
www.konkantoday.com