कराराच्या तरतुदीनुसार एसटी कर्मचार्यांना महागाई भत्त्याची थकबाकी द्या -हनुमंत ताटे
एसटी कर्मचार्यांना कराराच्या तरतुदीनुसार उत्सव अग्रीम, महागाई भत्त्याची थकबाकी दिवाळी सणापूर्वी द्या अशी मागणी महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी केली आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांना कामगार संघटनेमार्फत सदर मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. १३ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर संघटनेने एसटी कर्मचार्यांना करारानुसार देयके देण्याची मागणी केली आहे.
www.konkantoday.com