रत्नागिरीतील जुने प्रसिद्ध नामवंत ॲडव्होकेट व माजी खासदार ॲड बापूसाहेब परूळेकर यांना महाराष्ट्र-गोवा बार असोशियन कडून दीपस्तंभ पुरस्कार
रत्नागिरीतील जुने प्रसिद्ध नामवंत ॲडव्होकेट व माजी खासदार ॲड बापूसाहेब परूळेकर यांना त्यांनी या क्षेत्रात केलेल्या गौरवास्पद कामगिरी बद्दल महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनच्यावतीने दीपस्तंभ पुरस्कार नुकताच देण्यात आला हा पुरस्कार बापूसाहेब परूळेकर यांना त्यांचे निवासस्थानी सुपूर्द करण्यात आला.
महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनची फेब्रुवारीमध्ये नाशिक येथे राज्यस्तरीय कॉन्फरन्स झाली होती. या कॉन्फरन्समध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुने व नामवंत प्रसिद्ध ॲडव्होकेट व माजी खासदार बापूसाहेब परूळेकर यांना त्यांच्या या क्षेत्रातील केलेल्या गौरवास्पद कामाबद्दल दीपस्तंभ पुरस्कार जाहीर झाला होता. त्या कार्यक्रमाला बापूसाहेब वयोमानामुळे उपस्थित राहू न शकल्याने हा पुरस्कार महाराष्ट्र-गोवा बार असोशियनचे कोकणचे प्रतिनिधी संग्राम देसाई यांनी स्विकारला होता. या पुरस्कार कार्यक्रमाला न्यायमूर्ती अरविंद बोबडे यांचेसह मान्यवर उपस्थित होते राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता.
रत्नागिरी येथे काल बापूसाहेब परूळेकर यांचे निवासस्थानी महाराष्ट्र-गोवा बार असोशियनचे कोकणचे प्रतिनिधी संग्राम देसाई यांनी हा पुरस्कार व मानचिन्ह बापूसाहेब परूळेकर यांना सुपूर्द केले. यावेळी सिंधुदुर्ग बार असो. चे अध्यक्ष उमेश सावंत, कुडाळचे अमोल सावंत, रत्नागिरी बार असो. चे अध्यक्ष अशोक कदम, मुदस्सर डिंगणकर व बापूसाहेब परूळेकर यांचे सुपुत्र ऍड. बाबा परूळेकर हे उपस्थित होते.
www.konkantoday.com