मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूलाकंपाउंड वॉल उभारून त्यावर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती आणि छायाचित्रे प्रदर्शित करावीत-खा.प्रभू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूलाकंपाउंड वॉल उभारून त्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती आणि छायाचित्रे प्रदर्शित करावीत. त्यामुळे यामहामार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्याचीसंस्कृतीही समजेल, अशी आग्रही मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय विकास मंचाचे अध्यक्ष खासदार सुरेश प्रभू यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
श्री. प्रभू यांनी म्हटले आहे की, चौपदरीकरणामुळे सिंधुदुर्गजिल्ह्याच्या पर्यटन विकासाला खरी गती येणार आहे. यामहामार्गामध्ये खारेपाटण ते पत्रादेवी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाग येतो. सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून राज्य आणि केंद्र शासनाने जाहीर केल्याने विशेष बाब म्हणून या महामार्गावर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती आणि छायाचित्रे प्रदर्शित करणे आवश्यक आहे.सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक संघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, सचिव नकुल पार्सेकर, सोशल
मीडियाचे प्रमुख किशोर दाभोलकर यांनी या संदर्भात प्रभूयांचे लक्ष वेधले होते. यासंदर्भात प्रभू यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, या राष्ट्रीयमहामार्गावर पर्यटनस्थळांचे सेल्फी पॉइंट तसेच प्रत्येक १०किलोमीटरवर अत्याधुनिक पद्धतीचे पर्यटन माहिती केंद्रआणि कोकणी मेव्याची विक्रीकेंदेउभारावीत. त्याचबरोबरमहामार्गाच्या दोन्ही बाजूंना सिंधुदुर्गात उपलब्ध असलेली फळझाडे लावावीत. अशा प्रकारे सुविधा उपलब् धझाल्यास सिंधुदुर्गातील किनारे, इतिहास, संस्कृती, अन्नपदार्थ, कृषीआणि आरोग्य पर्यटनात वाढ होऊन स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button